Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

  • Home
  • India
  • Thane
  • Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी  वृत्तवाहिनी MAHARASTRAS MARATHI WEB PORTAL NEWS CHANNEL

29/09/2026

किल्ले दुर्गाडी येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून, या उत्सवाच्या पूर्वतयारी व नियोजनासाठी मंगळवारी किल्ले दुर्गाडी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. किल्ले दुर्गाडी देवस्थान नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष रवी पाटील, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या काळात किल्ले दुर्गाडी येथे सुमारे पाच लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, किल्ल्यावर आवश्यक नागरी सुविधा, वीज, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा तसेच गर्दीचे व्यवस्थापन याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून उत्सव सुरळीत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बंदी हुकूम मोडल्यानंतर किल्ले दुर्गाडी येथे सुमारे ५० ते ५५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. किल्ल्याचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे. या उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती किल्ले दुर्गाडी देवस्थान नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात आणि भाविकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
#किल्लेदुर्गाडी #दुर्गाडीदेवी #नवरात्रोत्सव #दुर्गाडीनवरात्रोत्सव #शारदीयनवरात्रोत्सव #कल्याण #कल्याणडोंबिवली #दुर्गाडी किल्ला #रवीपाटील #एकनाथशिंदे #डॉश्रीकांतशिंदे #नवरात्र२०२६ #देवीदर्शन #भाविकांचीसेवा #नवरात्रोत्सव२०२६ #आपलेशहरनामा #आपलेशहरवृत्तसमूह

जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साह...
29/09/2026

जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा
https://www.aapaleshaharnews.com/2026/09/engineers-day-celebrated-with-enthusiasm-under-the-joint-auspices-of-zilla-parishad-thane-and-the-maharashtra-state-zilla-parishad-engineers-association-thane-branch.html

29/09/2026

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजे प्रतिष्ठानचा रास गरबा रद्द; नगरसेविका अर्चना पाटील यांचे १.५० लाखांचे मानधनही मदतीसाठी

उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याला प्राधान्य; रास गरब्याचा खर्च शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय

दिवा : राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांच्या दुःखात सहभागी होत राजे प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने यंदाचा रास गरबा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेविका तथा राजे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना निलेश पाटील यांनी ही घोषणा केली. तसेच रास गरब्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्णयाचा आदर्श घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. उत्सव साजरा करण्यापेक्षा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

यासोबतच निवडून आल्यापासून आतापर्यंतच्या दहा महिन्यांचे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे मानधन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये जमा करण्याचा निर्णयही अर्चना पाटील यांनी घेतला आहे. या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, पूर असो, दुष्काळ असो किंवा कोरोनासारखे संकट, प्रत्येक वेळी राजे प्रतिष्ठान मंडळ जनतेच्या सेवेत खंबीरपणे उभे राहिले आहे. यापुढेही मंडळ जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील.

"उत्सव पुन्हा होतील… पण संकटाच्या काळात माणसाच्या सोबत उभे राहणे, हीच खरी सेवा!" या शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयामागील भावना व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत मदतीचा हात पुढे करण्याच्या राजे प्रतिष्ठानच्या या निर्णयाची परिसरात चर्चा होत आहे. उत्सवाच्या माध्यमातून होणारा खर्च समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी वापरण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
#अर्चना_पाटील #राजे_प्रतिष्ठान #शेतकरी_मदत #शेतकऱ्यांच्या_पाठीशी #रास_गरबा_रद्द #शेतकरी_सेवा #सामाजिक_बांधिलकी #शेतकरी_हित #डॉ_श्रीकांत_शिंदे #श्रीकांत_शिंदे_फाउंडेशन #नगरसेविका_अर्चना_पाटील #जनसेवा #माणुसकीचा_हात #डोंबिवली #कल्याण_डोंबिवली #आपले_शहरनामा

29/09/2026

डोंबिवलीत पोलिसांचा माणुसकीचा हात; छातीत दुखणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी दिला सीपीआर

डोंबिवलीतील शिळफाटा रोडवर पोलिसांच्या तत्परतेचा आणि माणुसकीचा प्रत्यय आला आहे. छातीत तीव्र वेदना होत असलेल्या दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी कोळशेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम जाधव यांनी तात्काळ धाव घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित व्यक्तीला सीपीआर देत प्राथमिक मदत केली. त्यानंतर पुढील उपचारांसाठी दुचाकीस्वाराला पलावा येथील जीवदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, पोलीस कॉन्स्टेबल गौतम जाधव यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

29/09/2026

फेरीवाले हटवण्याऐवजी बसवता कशाला? निलेश पाटलांचा सवाल

ठामपाच्या नावाने फेरीवाल्यांकडून वसुली करणाऱ्यांना निलेश पाटलांचा सज्जड दम; दोन

दिवसांपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पुन्हा वसुलीचा मुद्दा चर्चेत

दिवा-साबेगाव : दिवा-साबेगाव परिसरात फेरीवाल्यांकडून ठामपाच्या नावाने पैसे वसूल केले जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे निलेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी निलेश पाटील आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही वसुली सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर निलेश पाटील यांनी वसुली करणाऱ्यांना जाब विचारत सज्जड दम दिला. फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना हटवण्याऐवजी त्यांना बसवता कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फेरीवाल्यांकडून पैसे वसूल करण्याच्या प्रकारामुळे दिवा-साबेगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे. ठामपाच्या नावाने वसुली होत असल्याचा आरोप समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, फेरीवाल्यांकडून कथित वसुलीचा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#दिवा #साबेगाव #निलेशपाटील #शिवसेना #फेरीवालावसुली #फेरीवाले #ठामपा #अतिक्रमणविभाग #वसुलीखोर #दिवान्यूज #ठाणेन्यूज #आपलेशहरनामा

28/09/2026

ठाण्यातील कोपरी परिसरात रविवारी रात्री सुमारे ११.१५ वाजता जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या काही महिलांनी युवा सेनेचा कार्यकर्ता सिद्धू अभंगे याला मारहाण केल्याची घटना समोर...

कपड्यांच्या बाजारातील जुन्या कपड्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप...

कोपरी पोलीस ठाण्यात महिलांचा आक्रमक पवित्रा..

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ...
28/09/2026

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या मुख्यालयात झालेल्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य आणि महामंडळाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी ११०० बसेस ई-बसेस आहेत. ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या बसेस नियमानुसार टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे ताफ्याचे आधुनिकीकरण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे.

२०२७ पासून ई-बसमध्ये रूपांतर

सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे.

सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने इलेक्ट्रिक बसेसचा अधिक काळ वापर करता येणार आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे इंधन खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे.

चार्जिंग स्टेशनची उभारणी समांतरपणे

ई-बसेसच्या वाढत्या संख्येला आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येणार आहेत.

“एसटी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा आमचा संकल्प आहे. २०३७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी भविष्यात हरित महाराष्ट्राची ‘ई-लालपरी’ बनेल. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे देशातील आदर्श मॉडेल महाराष्ट्रात उभारण्याच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू आहे, ”असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Address

Thane
400612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी:

Shortcuts

Share