21/12/2023
आज दि. २१/१२/२०२३ रोजी जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियनचा बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा 81 वा दिवस खालील मान्यवरांनी भेटी दिल्या
समाजसेवक मा.श्री.मारुती भापकर साहेब,
समाजसेवक मा.श्री.मानवजी कांबळे साहेब,
मा.श्री.चंदनजी कुमार साहेब.
मा.श्री.काशिनाथ भाऊ नखाते साहेब.
कामगारांना मार्गदर्शन करताना मा.श्री.चंदन कुमारजी साहेब म्हणाले 81 दिवस झाले तुमचे आंदोलन चालू आहे इतके दिवस झाले तुम्ही ही लढाई सुरू ठेवली आहे मनापासून तुम्हाला सलाम करतो मार्गदर्शन करायला आलो नसून तुमच्या लढाईतून खूप काही शिकण्यासाठी आलो आहे.
81 दिवस झाले तुम्ही संघर्ष करत आहात त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे मी संदीप ला एका कार्यक्रमांमध्ये भेटलो त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा मला कळाले की जनरल मोटर्स कामगार संघटना कंपनीसोबत तुम्ही संघर्ष करत आहात तुमच्या संघर्षाला मी सलाम करतो एका हिंदी कवीने खूप छान लिहिला आहे ते मी बोलतो
"तुम रात लिखो हम चांद लिखेंगे
तुम एफ आय आर लिखो हम तयार लिखेंगे
तुम कतल करो हम भूत लिखेंगे भूत बनाके सबूत लिखेंगे
तुम अदालत मे बैठे चुटकुले लिखो हम इन्साफ लिखेंगे इतना साफ लिखेंगे की अंधे भी पडेंगे और बहरे भी सुनेंगे
तुम जमीन मे खत लिखो, हम आसमान मे इन्कलाब लिखेंगे"
मी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनासाठी काम करत असतो, जगातील 50 ते 60 देशांमध्ये जागतिक युनियन च्या कामासाठी जाऊन आलेलो आहे. आपण जी लढाई लढत आहात ती फक्त तुमची लढाई राहिलेली नसून जगातील सर्व कामगारांसाठी एक निर्णायक लढाई झालेली आहे जनरल मोटर्स कंपनीचे वेगवेगळ्या देशात संघटनेसोबत संप सुरू आहेत. जनरल मोटर्स कंपनी देशात कामगारांना संपवण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरत असते. मी जनरल मोटर्स युनियन कमिटी व कामगार यांचे कौतुक करतो, यांनी जनरल मोटर्स कंपनीचे हे तंत्र समजून घेतले आणि योग्य पद्धतीने कायदेशीर लढाई दिली परंतु आज जिंदाबाद मुर्दाबाद एवढेच बोलून काही होत नाहीये आपल्याला ही लढाई वेगळ्या पद्धतीने लढावी लागेल. जनरल मोटर्स आंतरराष्ट्रीय कंपनी असल्याने आपल्याला जागतिक पातळीवर असणाऱ्या ग्लोबल ट्रेड युनियन चे महत्त्व समजून घ्यावे लागेल. मी ट्रेड युनियन च्या माध्यमातून तुम्हाला सर्वतोपरी मदत करणार आहे. युनायटेड ऑटोमोबाईल वर्कर्स अमेरिकेतील सर्वात मोठी कामगार संघटना आहे त्यांचा अमेरिकेत संपत सुरू आहे त्या संपाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भेट दिली व अमेरिकेत असा कायदा पारित केला की युनायटेड ऑटोमोबाईल वर्कर्स युनियन यांना जी कंपनी सहकार्य करत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही संघटनेची ताकद आहे. या लढाईत मी सदैव तुमच्या सोबत आहे. सरकार आणि कंपनी प्रशासन यांनी लवकरात लवकर तोडगा न काढल्यास येत्या महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कामगार त्यांचे कुटुंबीय रस्त्यावरती उतरतील असं नियोजन आपल्याला करावं लागेल आणि ते आपण निश्चितच करू.
तसेच मा.श्री.मानवजी कांबळे यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र सरकारवर टीका केली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही कामगार विभागाची चूक आहे असं सांगून विषय भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पालकमंत्री या नात्याने वेळोवेळी या विषयाचे गांभीर्य त्यांना सांगितलेलं आहे ते सुद्धा लेखी आणि मला माहित नव्हतं किंवा मी ते करू दिलं नसतं अशा प्रकारची भाषा ते आता वापरू शकत नाहीत .आता कामगार मंत्र्यांची चूक झाली हे जर तुम्ही कबूल करत आहात , जाहीर रित्या कबूल करत आहात तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे त्यांनी स्पष्ट कराव आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा.
समाजसेवक मा.श्री.मारुती भापकर साहेब कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे मग तो वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची तयारी पण आपल्याला ठेवावी लागेल आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे असं बोलून कामगारांना पुढील लढाईसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजसेवक मा.श्री.काशिनाथ भाऊ नखाते यांनी सुद्धा कामगारांना मार्गदर्शन केले. कामगार हा जगाचा पोशिंदा मानला जातो पण इथे कामगारांना रस्त्यावर बसावं लागतं. कामगारांच्या या लढाईत आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सदैव तुमच्या सोबत रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू.