24/01/2024
हिंदुत्वाचा हुंकार
जय श्रीराम !!! जय जय श्रीराम !!!
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये साध्वी ऋतंबरा यांची भेट झाली. अगदी तीन-चार मिनिटेच त्यांच्याशी संवाद साधता आला. मी त्यांना एका दिवसाची आठवण करून दिली. ज्या दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती तोच दिवस.२१मे १९९१. त्याच दिवशी केवळ दोन तास आधी वाकोला ब्रिज सांताक्रुझ येथे साध्वींची तुफानी सभा झाली होती. लोकसभा इलेक्शनचा तो माहोल होता पण साध्वींच्या भाषणात राम जन्मभूमी आंदोलन होते.
मी आठवण करून दिल्यानंतर साध्वींना तो संपूर्ण दिवस आणि त्यानंतरच्या घटना आठवल्या.
मी त्या सभेला पोहोचू शकलो नव्हतो परंतु लोकलमध्ये ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्यापैकी काही अशा होत्या..
आगेवाले बोलो जय श्रीराम
पीछेवाले बोलो जय श्रीराम
बीचवाले बोलो जय श्रीराम
खिडकीवाले बोलो जय श्रीराम
लटकनेवाले बोलो जय श्रीराम
लोकलच्या डब्यात त्या त्या ठिकाणी असलेले सर्व प्रवासी खणखणीत आवाजात जय श्रीरामचा नारा देत होते. तेंव्हाचे आजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळी खलनायक होते.इमाम बुखारी तर..... जाऊ दे.
या तिघांसाठी ठेवणीतल्या घोषणा होत्या..
व्हीपी ** सावधान
जाग रहा है हिंदुस्तान
राजीव *** सावधान
जाग रहा है हिंदुस्तान
इमाम *** सावधान
जाग रहा है हिंदुस्तान
आणि काही कॉलेजमध्ये जाणारी पोरे जोरजोरात घोषणा देत फिरत असत ..
कमर मे लुंगी
मुंह में पान
भागो **
पाकिस्तान
सेना भवनच्या चौकात अडवाणींची सभा झाली होती. त्यावेळी पांढरे कपडे घालून शत्रुघ्न सिन्हा प्रथमच भाजपच्या स्टेजवर आला होता. त्या सभेत प्रमोद महाजन यांनी "मुल्ला यम सिंग" असा उल्लेख केला होता.छगन भुजबळ यांचेही हिंदुत्वावर तुफानी भाषण झाले होते.
मुंबईत हळूहळू युतीचे वारे वाहू लागले होते. सामनामधून तर उघड उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे निळूभाऊ खाडिलकर यांच्या नवाकाळनेसुद्धा रामजन्मभूमीला पाठिंबा दिला होता. हिंदुत्वाच्या लाटेवर नवाकाळ स्वार झाला आणि त्यातील अग्रलेख तुफान गाजू लागले. इतके गाजू लागले की त्याच्या झेरॉक्स वाटल्या जाऊ लागल्या.डावीकडे झुकलेली महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ही आघाडीची दैनिके फिकी पडू लागली होती .मुंबईकरांच्या मनावर सामना आणि नवाकाळ यांनी राज्य गाजवायला सुरुवात केली.सायंदैनिक म्हणून शब्दकोड्यामुळे लोकप्रिय झालेल्या महानगरला उतरण लागली ती निखिल वागळेच्या जहरी हिंदुत्वविरोधी अग्रलेखांमुळे. निखिलचा उल्लेख बाळासाहेबांनी "कोड्यावर जगणारा कोडगा" असा केला होता.
काल संध्याकाळी हा सगळा कालखंड नजरेसमोरून भराभर सरकत गेला. हे सर्व कशासाठी होत होते ? मुघलांच्या आक्रमणाने जमीनदोस्त झालेली हिंदूंची मंदिरे, श्रद्धास्थाने,विद्यापीठे, संस्कृती यांच्या पुनरुत्थानासाठी उभारलेली चळवळ आहे ही. आहे अशासाठी म्हटले की ती अजून पूर्ण झालेली नाही.
राम जन्मभूमी आंदोलन सुरूच होते आणि संघाने या आंदोलनाला बळ देण्याचे ठरवले.भाजपने राजकीय बळ दिले. विश्व हिंदू परिषदेने प्रत्यक्ष संघटनात्मक बळ दिले. विश्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारले गेले. त्याचे राजकीय नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा काढून केले.हा प्रश्न अत्यंत ज्वलंतपणे देशासमोर मांडला.
विसावे शतक म्हातारपणाची काठी टेकत टेकत नव्वदित प्रवेश करत होते परंतु तरुण सळसळता भारत हिंदुत्वाच्या लाटेवर श्रीरामाचे नाव घेत स्वार झाला होता. मुलायम सिंग यांच्या गोळ्या झेलून बलिदान दिलेल्या असंख्य कारसेवकांना श्रद्धांजली म्हणून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाचा पाडण्यात आला. कोर्टाच्या किचकट लढाया जिंकल्या आणि ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराचा रस्ता प्रशस्त झाला.प्रशस्त झालेल्या रस्त्यावर मोदींनी मग सुसाट वेगाने राम मंदिर उभे केले आहे.
खूप वर्षांपूर्वी अटलजींनी "अब हिंदू मार नही खायेगा" अशी घोषणा केली होती. ती घोषणा आज खरी ठरताना दिसत आहे. जात , भाषा ,पक्ष, पंथ या सगळ्यापलीकडे आज भारत रामनामाचा जप करत भगवा झाला आहे. संपूर्ण वातावरण श्रीराममय झाले आहे.
आता पुन्हा कोणालाही "अब हिंदू मार नही खायेगा" असे म्हणण्याची वेळ येणार नाही कारण हिंदूंकडे वाकडा डोळा करून पाहण्याची आता कोणाचीही आता हिंमत होणार नाही.हिंदूंना ही ताकद देण्याचे महत्कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी हे आजचे हिंदुहृदयसम्राट आहेत.
देशातील नागरिकांचे हिंदू म्हणून इतके अतिभव्य प्रकटीकरण याआधी कधीही झाले नव्हते. आज होणारी रामलल्लाची प्रतिष्ठापना येणाऱ्या कित्येक पिढ्यांना बळ देऊन जाणार आहे , प्रेरणादायी ठरणार आहे .
आज अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. या एका घटनेचे खूप मोठे सांस्कृतिक,राजकीय आणि आंतरराष्ट्रीय महत्व असून एक मोठा संकेत दिला गेला आहे.तो संकेत आहे
"हिंदुत्वाचा हुंकार."
आनंद देवधर
२२/०१/२०२४