Suhas kalbhor

Directions

Suhas kalbhor Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Suhas kalbhor, Car dealership, osmanabad, Murum.

29/10/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव चे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी आदरणीय श्री.अरविंदजी गोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई तुळजाभवानी, संत गोरोबाकाका त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना !

22/10/2024

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळाला, उभारी घेण्यासाठी बळ मिळाले आहे..

महिला सक्षमीकरणातील ही योजना एक सक्षम पाऊल ठरणार आहे!

#योजना #महाराष्ट्र #सरकार #महिला

22/10/2024
22/10/2024

कुशल संघटन आणि असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर 'सशक्त आणि समृद्ध' भारताच्या निर्मितीसाठी अव्याहत कार्य करणारे, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा.ना.श्री.अमितभाई शहा साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#भाजपा #महाराष्ट्र

22/10/2024
22/10/2024
21/10/2024

तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार !

तुळजापूर विधानसभेसाठी भाजपाकडून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जनसेवेच्या संधीबद्दल धन्यवाद..

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सोलापूर-तुळजापुर-धाराशिव रेल्वेमार्ग मागील ५ वर्षात आपण सर्वांनी मिळून मोठ्या ताकदीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अनेक अडचणींवर आजवर मोठ्या हिंमतीने मात करीत आपल्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मागील ५ वर्षात जी विकासकामे केली, त्याची पावती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल पक्षाच्या सर्व मान्यवर नेते मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मिळून खूप ताकदीने अनेक कामे पुढे नेली आहेत. वेगवेगळ्या संकटांवर मात केली आहे. पुढील काळात आणखी ताकदीने मिळून काम करायचे आहे.

मागील कार्यकाळात ज्या गोष्टी आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, जवळपास त्या सर्व बाबी महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षात पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील २४ महिन्यांत मतदारसंघात २०० पेक्षा अधिक रस्ते मंजूर केले. अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला लाभली, हे आपले भाग्य आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटक तुळजापूरला यावा, मुक्कामी रहावा यातून हजारोंच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपले नियोजन सुरू आहे. त्यासाठीच २,००० कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने त्याला तत्वतः मान्यताही दिली आहे. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा रोजगार निर्माण होईल त्यासाठीच आपला अट्टाहास आहे.

पुढील काळात आपल्या भागासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प खेचून आणायचे आहेत. कृष्णा खोर्‍याचा विषय आपल्या साथीने लावून धरला. वर्षाखेरीस तुळजाभवानी देवीच्या चरणी पश्चिम महाराष्ट्रातील पाणी येईल. कौडगाव आणि तामलवाडी एमआयडीसीचे काम पूर्ण केल्याखेरीज आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याचा विषय असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्न तेरणा उपसासिंचन दुरुस्ती योजना असे अशक्यप्राय असणारे अनेक विषय केवळ अडीच वर्षाच्या आपल्या महायुती सरकारच्या सत्ताकालावधीत आपल्या सर्वांच्या मदतीने पूर्ण करता आले.

पीकविमा, अनुदानासाठी तसेच कोविड काळात सर्वांनी मिळून केलेली कामे सर्व जनतेच्या समोर आहेत. यापुढेही जनहिताची आणि विकासाची कामे करण्यासाठी आपल्याला बळ मिळाले आहे. केवळ तुळजापूरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेकांच्या साथीने मोठे काम उभे करायचे आहे. केंद्रात आणि राज्यात पुन्हा आपलेच सरकार असणार आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील, आपल्या मनातील जे धाराशिव आहे, जे तुळजापूर आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकतीने काम काम करण्यासाठी आपले सर्वांची साथ, मला हवी आहे..

#तुळजापूर #भाजपा

17/10/2024

महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

रामायणासारख्या महाकाव्यातून संघर्ष, न्याय, कर्तव्य, सत्य, त्याग, आस्था आणि प्रेमाचा संदेश त्यांनी दिला..

श्री प्रभू रामचंद्र यांचे जीवन मांडताना समस्त मानव जातीला त्यांनी जीवनाचा गर्भित अर्थ सांगितला आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारून त्याचा प्रसार करण्याचा संकल्प करूया..

#महर्षी #वाल्मिकी

17/10/2024

भाजपा आणि महायुतीच्या सर्व नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..

राज्याच्या हिताचे अधिकाधिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून व्हावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!

Chitra Wagh Vikrant Patil Dr. Manisha Kayande - डॉ. मनीषा कायंदे Hemant Patil - हेमंत पाटील

Address

Osmanabad
Murum
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhas kalbhor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category