Shrinath Tyre

Shrinath Tyre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shrinath Tyre, Tire Dealer & Repair Shop, Kurduvadi.

21/02/2024
मोलभाव करा पण योग्य ....परिस्थितीशी दोन हात करणाऱ्यांना अन या वयातही कुटुंबाचा भार पेलणाऱ्यांना यथोचित मदत करा...!!!शुभ ...
11/11/2023

मोलभाव करा पण योग्य ....परिस्थितीशी दोन हात करणाऱ्यांना अन या वयातही कुटुंबाचा भार पेलणाऱ्यांना यथोचित मदत करा...!!!
शुभ दीपावली...🎉🎉

"सर किती पैसे झाले?"गळ्यातला रुमाल काढून झटकत पुन्हा गळ्याभोवती माळत त्यांनी चकित होऊन वर पाहिले. त्यांच्या आयुष्यात त्य...
04/02/2023

"सर किती पैसे झाले?"

गळ्यातला रुमाल काढून झटकत पुन्हा गळ्याभोवती माळत त्यांनी चकित होऊन वर पाहिले. त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणीतरी पहिल्यांदाच "सर" म्हणत होतं. त्यांचं शिक्षण काय? ते राहतात कुठे? हे काम करताना त्यांची मजबुरी काय? यातला एकही प्रश्न विचारात न घेता मी त्यांच्या ईमाने इतबारे चालणाऱ्या हातांनी माझं लक्ष वेधलं.
गोष्ट माझ्या शूजची आहे.मुळात मौजे घालून त्यावर पॅकबंद बुटाडाला लेसने आवळून गर्माट मामला मला कधीच जमला नाही.काहींना प्रोफेशन म्हणून तर काहींना स्टाईल म्हणून हे आवडतं. तर काहींची सवय.मला आपलं मस्त चप्पल घालून मोकळं ढाकळं भावतं.आज नाईलाजाने हा बंदिस्त पेहराव तळपायांना चढवावा लागला.आता या पेहरावाला कडक करुन चमकावलं तर पाहिजे म्हणून घाटकोपर स्टेशनवरच हे बैठं स्टॉल गाठलं. मी बच्चनच्या डॉन सिनेमात असं स्टॉल पहिल्यांदाच पाहीलं होतं. स्टाईल मध्ये वितभर उंचीच्या लाकडी स्टॅन्डवर माझा शूजधारी पाय ठेवला आणि निरनिराळ्या क्रीमच्या डब्यात ब्रश बुडून सपासप चालू लागला. तीन मिनिटात चमक आली. मग मी विचारलं, "सर किती पैसे झाले?"
"सर" हा शब्द त्यांच्या कानाला परकाच असावा मात्र कमालिचा बिलगला.
"पंधरा घेतो... तुम्ही दहाच दया"
मस्त स्माईल करुन हसत म्हणाले.
मी चकाकत्या बुटाडाकडे पहात मार्गी लागलो.
व्यासायिक कोणीही असो, कोणताही व्यवसाय असो आदर देत चला..सहज एखाद्या टपरीवरच्या चहावाल्याला सर किंवा साहेब म्हणा..
छोट्याशा का असेना ते त्यांच्या साम्राज्याचे बॉस असतात. सन्मानाने जगण्यासाठी लाचारी करत नाहित आणि आदर दिला तर तो सुव्याज परत मिळतो.
खरं आहे ना!?

22/10/2022

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा हि शुभेच्छा....!

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत हि शुभेच्छा.....!

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....!

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....!

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी हि शुभेच्छा.....!

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....!

आपल्या खिशाला कातर लाऊन आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी काही न घेता मन मारुन दिवाळी साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दीवाळी साजरी करता यावी त्याबद्दल शुभेच्छा..!

सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊदे हीच इच्छा...🙏🚩

Happy Diwali
14/11/2020

Happy Diwali

17/07/2020

Stay safe

Address

Kurduvadi
413208

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrinath Tyre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share