Kanase Hyundai Karad

Kanase Hyundai Karad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kanase Hyundai Karad, Cars, Shivdarshan Colony, Opposite Hotel Gandharva Karada, Dist Satara, Karad.

Congratulations MAHESH CHAVAN PURCHASE HYUNDAI NEW CRETA
13/05/2019

Congratulations MAHESH CHAVAN PURCHASE HYUNDAI NEW CRETA

कणसे ह्युंडईमध्ये अत्यंत दिमाखदार सोहळ्यात मा.राज्यपाल श्रीनिवास पाटील ,डी वाय आरटी ओ अजित शिंदे व संदीप देसाई तसेच जि प...
25/10/2018

कणसे ह्युंडईमध्ये अत्यंत दिमाखदार सोहळ्यात मा.राज्यपाल श्रीनिवास पाटील ,डी वाय आरटी ओ अजित शिंदे व संदीप देसाई तसेच जि प.सदस्य सागर शिवदास यांच्या हस्ते नवीन सँट्रोचं अनावरण करण्यात आलं. ज्या कारनं ह्युंडई मोटर्सला भारतात ओळख मिळवून दिली ती सँट्रो आज नवीन रूपात ग्राहकांसाठी कणसे ह्युंडई कराडमध्ये उपलब्ध झाली. वीस वर्षांपूर्वी सँट्रो कारनं भारतात खऱ्या अर्थाने वाहन उद्योगात क्रांती घडवून आणली होती. भारतातली खरी फँमिली कार म्हणजे सँट्रो अशी सँट्रोची ओळख निर्माण झाली. टॉलबॉय डिझाइन, अत्यंत आरामदायी आसनव्यवस्था आणि कमीत कमी देखभालीसाठी सँट्रो ओळखली जाऊ लागली. मूळ टॉलबॉय डिझाइनला धक्का नं लावता अत्याधुनिक फीचर्ससह नवीन सँट्रो ग्राहकांच्या सेवेत दाखल झाली आहे. गेल्या महिनाभरापासून नवीन सँट्रोसाठी ऑनलाइन बुकींग सुरू झालं होतं. सँट्रोची विश्वासार्हता लक्षात घेऊन देशभरातून 25000 ग्राहकांनी नवीन सँट्रो नं पाहताही बूकींग केलं. सध्याच्या काळात वाहन उद्योगात कार नं पाहता इतक्या मोठ्या संख्येनं बुकींग होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यावेळी मा.राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब नवीन सँट्रोच्या फीचर्सची माहिती घेतली. नवीन सँट्रो स्त्रियांसाठी अतिशय आरामदायी आणि परिपूर्ण आहे. विशेषतः स्मार्ट ऑटो ट्रान्समिशन सारखं फीचर स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
नवीन सँट्रोमध्ये अगदी बेसिक मॉडेलपासून एबीएस सह इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (इबीडी), एअरबँग्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेव्हिगेशनसाठी अँड्रॉइड व आयओएस कनेक्टीव्हीटी, रिव्हर्स पार्कींग सेन्सर्स सह कँमेरा, स्टीअरींग माऊंटेड ऑडीओ, ब्ल्यू टूथ कंट्रोल्ससह या प्रकारच्या कारमध्ये पहिल्यांदाच रियर एसी व्हेंट्स व इको कोटींग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. सुरक्षिततेचं पुढचं पाऊल म्हणून स्टिअरिंगवर व्हॉइस रेकग्निशन बटन देण्यात आले आहे. नवीन सँट्रोसाठी उच्च दर्जाच्या स्टीलचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय अनेक फीचर्सची लयलूट नवीन सँट्रोत करण्यात आली आहे. एकूण सात रंगात नवीन सँट्रो बाजारात येत आहे. मँन्यूअल व स्मार्ट ऑटो ट्रान्समिशन या दोन प्रकारात नवीन सँट्रो उपलब्ध होणार असून कराड व जिल्ह्यातील ग्राहकांना एक दर्जेदार वाहन उपलब्ध झाल्याची माहिती कणसे ह्युंडईचे कराडचे मॅनेजर प्रमोद पवार यांनी दिली. तसेच ग्राहकांनी कणसे ह्युंडईच्या शोरूमला भेट देऊन नवीन सँट्रोची टेस्ट ड्राइव्ह घेऊन बुकींग करावे असे आवाहनही केले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

13/07/2018

Address

Shivdarshan Colony, Opposite Hotel Gandharva Karada, Dist Satara
Karad
415539

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanase Hyundai Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category